21 Oct
नवीन कर्ज घेणार असाल तर प्रत्येक व्यावसायिकाने घ्यावी लागणारी काळजी
नवीन कर्ज घेणार असाल तर प्रत्येक व्यावसायिकाने घ्यावी लागणारी काळजी
गृह कर्जाचे व्याजदर कमी झालेत त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणं आता सोपं झालंय .सद्या मंदीमुळे आणि विशेषत: बँकांनी गृहकर्जावरील व्याज दर कमी केल्यामुळे नवीन घर घेणा-यासाठी चांगली संधी आहे.
जर तुम्ही आता किंवा पुढील दोन तीन वर्षांमध्ये कर्ज घ्यायच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्या साठी उपयुक्त ठरेल
१. सर्व प्रथम व्यवसाय नोंदणी ची सर्व कागदपत्रे तयार असायला हवी ती जर नसतील तर आताच नोंदणी करून घ्या
२. आपल्या व्यवसायाचे चालू खाते (CURRENT A /C) उघडून घ्या व व्यवसायाशी निगडित सर्व व्यवहार त्यामध्ये करा
३. आपल्या वस्तू किंवा सेवा यासाठी GST आहे की नाही त्याची माहिती घ्या . वस्तू साठी वार्षिक टर्नओव्हर रुपये ४० लाख व सेवा असतील तर वार्षिक टर्नओव्हर रूपये २० लाख आहे
४. दरवर्षी आपली इन्कम टॅक्स फाइल भरून घ्या व इन्कम टॅक्स पण भरा.
५. ३ वर्षाची इन्कम टॅक्स फाइल असेल, बँक मध्ये चांगले व्यवहार आणि तुमचा CIBIL चांगला असेल तर बँक तुम्हाला खात्रीशीर गृह कर्ज , तारण कर्ज ,व्यवसाय कर्ज , वाहन कर्ज यासाठी मदत करेल
६. गृह कर्ज घेणार असेल तर पहिल्यांदा कर्ज मंजूर करून घ्या त्यांच्या कढून SANCTION LETTER घ्या
७. गृहकर्ज घेतानाही बँकाचे नियम व्यवस्थित पाहूनच कर्ज घेतलं पाहिजे. कर्ज देताना बँकेकडून सर्वप्रथम त्याजागेचा प्लान व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. तसेच त्यासंबधीत योग्य कागदपत्रं पाहिली जातात. त्याच बरोबर सध्या एनऐ ऑर्डर पाहिली जाते. म्हणजे बांधकामाची जमीन बिगर शेती अंतर्गत असली पाहिजे. रिसेल घर घेताना पूर्वीचा मालकाच्या जागेचा सातबारा सर्टिफिकेट तसंच तो कोणाला कर भरत होता हे पाहणं गरजेच असतं.
८. गृहकर्ज घेताना तुम्ही किती वर्षासाठी कर्ज घेणार त्याचबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे यावरच तुम्हाला कर्ज दिलं जातं. म्हणून कर्ज घेताना भविष्यात वाढणारं उत्पन्न आणि आपणं कर्ज किती वर्षात परत करू शकतो यावर आपण किती रक्कम घ्यायची हे ठरवलं पाहिजे.साधारणत: उत्पन्नाच्या 60 पट कर्ज मिळतं. तसंच कुटुंबातील सगळयाच एकूण उत्पन्न मिळवून जॉइण्ट रक्कमेवरही कर्ज मिळू शकतं. समजा एखादी बँक गृहकर्ज देताना सामान्य बँकापेक्षा जास्त कर्ज दराने व्याज देत असेल तर आज अनेक पर्यायी बँका उपलब्ध आहेत त्यामुळे सर्वबाबीची तपासणी करून गृहकर्ज घ्यावं
९. कर्ज घेताना नेहमी बँक मधूनच घ्यावे कारण बहुतेक वेळा रिअल इस्टेट एजन्टच लोणची कामे करून देतात व फायनान्स कंपनी कडून कर्ज मंजूर करून देतात त्यामुळे फायनान्स कंपनी काही कागदपत्राची पूर्तता नसेल तर जास्त व्याज दर आकारून कर्ज देतात
पण असे करू नये
कारण
आमचे एक ग्राहक आहे त्यांनी २०१५ मध्ये घर खरेदी केले व रिअल इस्टेट एजन्टने फायनान्स कंपनी मधून कर्ज मंजूर करून दिले
आता माझ्या ग्राहकाने ते घर विक्री केली आहे पण समोरची पार्टीने बँक मध्ये कर्जासाठी अप्लाय केले असता काही कागदपत्रे बाकी आहेत जी माझ्या ग्राहकाकाकढे नाहीत व झालेला व्यवहार रद्द झाला.
आता त्यांना माहित झाले कि रिअल इस्टेट एजन्ट व विक्री झालेली व्यक्ती याना माहित होते कि काही कागदपत्रे बाकी आहेत पण त्यांनी ते लपवले व माझ्या ग्राहकाची फसवणूक झाली
असे होऊ नये म्हणून शक्यतो अशा एजन्ट कढून कर्ज प्रक्रिया करू नये तसेच तो जर जास्तच जवळचा असेल विश्वासू असेल तर रिस्क घेऊ शकता
आम्ही अलायन्स टॅक्स आणि फायनान्स एक्सपर्टस गेली 10 वर्षे कर ,कंपनी रेजिस्ट्रेशन व लोन सेवा ग्राहकांना देत आहोत.
अजून माहिती साठी आम्हाला संपर्क करू शकता
9769201316
#alliancetaxexperts #loan #tax #companyregistration